*कोंकण एक्सप्रेस*
*भुजनागवाडी अखंड भजनी सप्ताहाची सांगता*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाईच्या सुरू असलेल्या अखंड भजनी सप्ताहाची सांगता शुक्रवारी शहरातून पालखी प्रदक्षिणेने झाली. यावेळी भाविकांनी मार्गामार्गात पालखीचे स्वागत केले.
भुजनागवाडी विठ्ठल रखुमाईच्या अखंड भजनी सप्ताहाला २५ जुलैपासून प्रारंभ झाला होता. यानिमित्त मंदिरात पौराणिक देखावे, संगीत व वारकरी भजने, स्थानिकांची रांगोळी आदी कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील प्रसिद्ध रांगोळीकार प्रकाश शिरगांवकर यांनी वृक्षतोड वाचविण्याचा संदेश देणारी रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. ३१ जुलै रोजी दाभोसवाडा येथून वारकरी मंडळींनी ‘ज्ञानोबा तुकाराम‘च्या जयघोषात मंदिरात दिडी आणली. १ ऑगस्ट रोजी जुना स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठ, रामेश्वर मंदिर, पिराचा दर्गा मार्गे भुजनागवाडी मंदिर अशी विठ्ठल रखुमाईची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. भाविकांनी ठिकठिकाणी या पालखीचे स्वागत करून नारळ आणि ओटी अर्पण केली. तसेच लाडवांचा वर्षाव केला. मंदिरात महाआरती व गा-हाणे घालून अखंड भजनी सप्ताहाची सांगता करण्यात आली.
