*कोंकण एक्स्प्रेस*
*भाजप पदाधिकाऱ्यांची वीज ग्राहकांसोबत सांगवे येथील महावितरण च्या कार्यालयावर धडक*
*वीज ग्राहकांच्या भावनांशी खेळू नका – संदेश सावंत*
*5 ऑगस्ट रोजी सांगवे कनेडी येथील महावितरण च्या कार्यालयात वीजबिल संदर्भात विशेष बैठक – सौरभ माळी*
कनेडी दशक्रोशीतील वीज ग्राहकांची माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या नेतृत्वा खाली सांगवे येथील महावितरण च्या कार्यालयावर धडक देत महावितरण चे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्या समोर समस्याचा पाढाच वाचला तसेच गणेश चतुर्थी च्या सणा पूर्वी वीज वाहिनीच्या सर्व समस्या दूर करून गणेशोत्सवात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली यावेळी नागरिकांनी फॉल्टी मिटर, असल्याने विद्युत बिल मध्ये तफावत येणे, स्मार्ट मिटर ला विरोध, जुलै महिन्यात आलेली वाढीव बिले कमी करणे, लाईनमन ग्राहकांचे फोन उचलत नाही, सांगवे बांद वाडी येथील ट्रान्सफार्मर वरून जिओ च्या टॉवर ला विद्युत पुरवठा केल्याने कमी दाबाची वीज मिळणे, नाटळ गाव भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने दोन लाईनमन द्यावेत, दिगवळे व दारिस्ते साठी स्वतंत्र लाईनमन द्यावा, सांगवे कनेडी बाजारपेठ मधील लाईनमन च्या कामात सुधारणा न झाल्यास त्याची बदली करावी, सांगवे घोसाळवाडी येथे नवीन ट्रान्सफार्मर बसवावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी 5 ऑगस्ट पर्यंत कारभारात सुधारणा झालेली दिसेल असे आश्वासन दिले महावितरण च्या वतीने कार्यकारी अभियंता सौरभ माळी,उप कार्यकारी अभियंता संदीप पाटील, सहाय्यक अभियंता अविनाश तावडे, अमोघ थोरबोले तर भाजपच्या वतीने माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, माजी प स सदस्य राजू पेडणेकर,सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, दारिस्ते उपसरपंच संजय सावंत, दिगवळे उपसरपंच तुषार गावडे, अमेय सावंत, राजू सापळे,तसेच वीज ग्राहक उपस्थित होते
सध्या वीज ग्राहकांना आलेली वाढीव वीजबिले, फॉल्टी मिटर या संदर्भातल्या समस्या जाणून घेण्यासाठी 5 रोजी सकाळी 11 वाजता सांगवे कनेडी येथील महावितरण च्या कार्यालय येथे वीज ग्राहकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली तरी ज्या वीज ग्राहकांच्या तक्रारी असतील त्यांनी मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी उपस्थित रहावे असे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत व कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी केले आहे