कविता वर्षावासाच्या —- कविता परिवर्तनाच्या !* कणकवलीत रंगणार साहित्य,संगीत आणि पावसाचा सुरेल सोहळा!!

कविता वर्षावासाच्या —- कविता परिवर्तनाच्या !* कणकवलीत रंगणार साहित्य,संगीत आणि पावसाचा सुरेल सोहळा!!

*कोंकण एक्सप्रेस*

*कविता वर्षावासाच्या —- कविता परिवर्तनाच्या !*
कणकवलीत रंगणार साहित्य,संगीत आणि पावसाचा सुरेल सोहळा!!*

*कणकवली: प्रतिनिधी*

मराठी साहित्यातील निवडक कवींच्या कवितांचे अभिवाचन आणि अविस्मरणीय पाऊसगाण्यांची मैफल यांचा एकत्रित अनुभव देणारा खास कार्यक्रम कविता वर्षावासाच्या ——कविता परिवर्तनाच्या ! कणकवलीत आयोजित करण्यात आला आहे. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग यांच्या वतीने होणारा हा बहारदार कार्यक्रम येत्या ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत एच.पी. सी. एल. सभागृह कणकवली कॉलेज येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्य व नाट्य क्षेत्रातील मान्यवर कवी ,लेखक,अभिनेते ,संवादक आणि गायक सहभागी होणार असून सामाजिक परिवर्तनाची संकल्पना कवितांमधून प्रभावीपणे सादर केली जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष तथा प्रसंवाद चे संपादक इंजि.अनिल जाधव हे भूषविणार असून उद्घाटक ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व लोककला अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली च्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार ,कवी प्रा.प्रवीण बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होणार्‍या प्रमुख कवी आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये वीरधवल परब,सुनील हेतकर,डॉ. अनिल धाकु कांबळी , प्रा.डॉ राजेंद्र मुंबरकर, प्रा.डॉ. सोमनाथ कदम,विठ्ठल कदम,सरिता पवार, प्रा.डॉ. नामदेव गवळी ,प्रा. मोहन कुंभार ,कल्पना मलये ,प्रा.पूनम गायकवाड,पुरुषोत्तम कदम, नीलम यादव,प्रा.सुचिता गायकवाड, स्नेहा कदम यांचा समावेश आहे. कवितांचे अभिवाचन व सादरीकरण अभय खडपकर,राजेंद्र कदम, सचिन वळुंज ,नीलेश पवार,सुदिन तांबे,प्रा.सीमा हडकर, विद्याधर तांबे, श्रेयस शिंदे, रुपाली कदम,शैलेश तांबे,सुषमा हरकुळकर, अनुष्का तांबे या नाट्यकलावंत व अभिनेते , संवादकाच्या आवाजात रंगणार आहे.
त्यासोबतच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाऊसगाण्यांची संगीतमय मैफल महेश काणेकर, संदेश रावले, राकेश मिठबावकर, संदेश तांबे, अमृता घाडी आणि सहगायक यांच्या सादरीकरणात ही मैफल सादर होणार आहे यासोबतच निमंत्रित कवी -कवयित्री यांचे काव्य संमेलन ही रंगणार आहे या सामाजिक परिवर्तनाच्या आविष्काराची आणि साहित्य, नाट्यअभिनय व संगीत यांची त्रिसंधी साधणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे कार्यवाह राजेश कदम, कोषाध्यक्ष संध्या तांबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, सहकार्यवाह मधुकर मातोंडकर, आणि माजी अध्यक्ष अरुण नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!