*कोंकण एक्सप्रेस*
*फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने पंचवीस हजार रुपयेची मदत कै.नितीन मुसळे यांच्या कुटुंब आणि मुलाच्या शिक्षणासाठी दिली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कलमठ मध्ये राहणारे फोटोग्राफर नितीन मुसळे यांचे अलीकडेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्यावर फार मोठी कुटुंबियाची जबाबदारी होती.त्याच्या जाण्याने कुटुंब पुर्ण पोरके झाले.
बाल वयापासून च खडतर प्रवास करून शिक्षण घेत फोटोग्राफी करत कणकवली बाजारपेठेत आपले वर्चस्व निर्माण केले. आपल्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन कणकवली तालुक्यात प्रापंचिक गाडा निर्माण केला. फोटो ग्राफी सोबत एक चहा नाष्टा चा एक स्टाॅल सुरू करून नावलौकिक मिळवून कुटुंबियांचा आधारप्रमुख बनला. मुलाचे शिक्षण प्रगतीपदावर असताना अचानक एक अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कुटुंब पोरके झाले याची दखल कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या सर्व फोटोग्राफर यांच्या वतीने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. सर्वांनी उत्स्फूर्त प्रतीसाद देत पंचवीस हजार रुपये जमा करून कै.नितीन मुसळे यांच्या कुटुंब आणि मुलाच्या शिक्षणासाठी सदर रक्कम त्यांना देण्यात आली.