मसदे येथील स्वामी समर्थ मठात ११ रोजी विविध कार्यक्रम

मसदे येथील स्वामी समर्थ मठात ११ रोजी विविध कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*मसदे येथील स्वामी समर्थ मठात ११ रोजी विविध कार्यक्रम*

*पोईप : (वार्ताहर)*

मालवण तालुक्यातील मसदे वडाचापाट येथे प. पु. गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी ८ वा. सामूहिक सत्यनारायण महापूजा, ११ वा. महाआरती, दुपारी १२ वाजता गावडे काका महाराज यांच आध्यात्मिक मार्गदर्शन, १ वा. महाप्रसाद-अन्नदान, २.३० वा. श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोईप बुवा ओंकार येरम यांचे भजन, सायंकाळी ५ वा. भजने, ७ वा. दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवेकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!