कट्टा येथील वराडकर कॉलेज येथे शालेय व महाविद्यालय सुरक्षा कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन

कट्टा येथील वराडकर कॉलेज येथे शालेय व महाविद्यालय सुरक्षा कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*कट्टा येथील वराडकर कॉलेज येथे शालेय व महाविद्यालय सुरक्षा कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन*

*मालवण ः प्रतिनिधी*

“आपदा सेवा सदैव सर्वत्र” म्हणजेच आपत्तीच्या वेळी सदैव सेवा हे ब्रीदवाक्य असलेले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल नेहमीच देशात कोणतीही आपत्ती आल्यास आपत्तीग्रस्तांचा बचाव व त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असते. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, हे टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे. आपत्तीग्रस्त लोकांची मदत कशी करावी, याचे ज्ञान प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन एन डी आर एफ च्या निरीक्षक प्रभीशा यांनी येथे बोलताना केले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा आणि वराडकर हायस्कूल कट्टा यांच्या सहकार्याने सिद्धिविनायक हॉल कट्टा येथे शालेय व महाविद्यालय सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एन डी आर एफ च्या निरीक्षक प्रभीशा या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रविंद्र गावडे व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्ट्याचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक,एन. डी. आर. एफ. टीमचे सहाय्यक उपनिरीक्षक विजय मस्के, हवालदार मुकुंद शेळके, हवालदार अनिरुद्ध गवांडे, हवालदार प्रदीप पाटील, हवालदार श्याम फापले, हवालदार त्रिपुरारी कुमार, सिपाही सय्यद अझहर, सिपाही छत्रपती खांदवे, सिपाही श्रीकांत पाटील, सिपाही चेमटे वाल्मिक, सिपाही नितीन वाघमोडे, सिपाही गडाख विकास, सिपाही संदीप खुटवड आदी उपस्थित होते

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले
यानंतर एन. डी. आर. एफ. टीममधील सदस्यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवून दुर्घटना स्थळी वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी प्रथमोपचार पद्धती, एखाद्याची श्वसन प्रक्रिया काही कारणांमुळे बंद पडली असता त्याला कृत्रिम श्वास कसे दिले जाते, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत. अपघात ग्रस्ताला उपचार देण्यासाठी स्टेचर उपलब्ध नसताना उपलब्ध साहित्याचा वापर करून स्ट्रेचर कसे बनविले जाते. आग लागली असता अग्निशमक यंत्राचा वापर कसा करावा. तसेच भूकंप व पूर आल्यास काय करावे इत्यादीची माहिती दिली. यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक मस्के विजय यांनी देखील आपत्ती व्यवस्थापन विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!