दांडी येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली…

दांडी येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली…

*कोंकण एक्सप्रेस*

*दांडी येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली…*

*नागरिकांमधून समाधान ; सन्मेष परब यांनी मानले भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार…*

*मालवण ः प्रतिनिधी*

दांडी येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत होते. त्यामुळे या भागात असलेल्या ६० केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वाढ होण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही झाली आहे.
अनेक वर्षे नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे दूर झाली असून हा विषय मार्गी लागण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, मच्छीमार सेलचे संयोजक विकी तोरसकर यांचे आभार मानले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दांडी भागातील सर्वांगीण विकास करण्याचा आमचा मानस असून हा विषय मार्गी लावण्यासाठी मदत करणाऱ्या स्थानिक माजी नगरसेविका सेजल परब, महिला शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर, पंकज सादये यांचेही भाजपा तालुका पदाधिकारी सन्मेष परब यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!