*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर हरकूळखुर्द या प्रशालेत शालांत परीक्षा मार्च 2025 च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*फोंडाघाट ः गणेश ईस्वलकर*
विद्यामंदिर हरकूळखुर्द या प्रशालेत शालांत परीक्षा मार्च 2025 च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. यादव सर यांनी केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजन दत्तात्रय रासम( सरपंच ग्रामपंचायत हरकूळखुर्द) यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. व्यासपीठावर माननीय श्री.विठ्ठल शिवाजी रासम (अध्यक्ष, हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई) श्री सर्वेश सुभाष दळवी (उपसरपंच ग्रामपंचायत हरकूळखुर्द) सौ.आरती सखाराम घाडी (पोलीस पाटील,हरकूळखुर्द) श्री.आशुतोष अंकुश रासम (अध्यक्ष, शालेय समिती) तसेच श्री. गंगाधर दत्तात्रय रासम (मुंबई संस्था सभासद) श्री अशोक दाजी रासम (सभासद शालेय समिती) श्री.अनिल रघुनाथ सावंत (सभासद,शालेय समिती) श्री.विद्याधर वालावलकर(माजी. सभासद शालेय समिती ) श्री. बाबाजी दळवी (मुंबई संस्था सभासद) श्री विशांत विलास रासम, तानाजी रासम, रोहित घाग, पांडुरंग रासम, धोंडी अण्णा, दत्तात्रेय जोशी सर, राजेंद्र डिचवलकर व इतर मान्यवर उपस्थित होते प्रशालेतून तसेच फोंडाघाट केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या कु. स्वराली विलास भोसले (95.60%) हिचा सत्कार श्री.राजन दत्तात्रय रासम( सरपंच ग्रामपंचायत हरकूळखुर्द)यांच्या हस्ते, द्वितीय क्रमांक कु. संध्या दिगंबर तेली (88.40%) हिचा सत्कार माननीय श्री.विठ्ठल शिवाजी रासम (अध्यक्ष, हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई) तृतीय क्रमांक कु.कार्तिकी पंढरी डोंगरे (85.40%) हिचा सत्कार श्री.सर्वेश सुभाष दळवी (उपसरपंच ग्रामपंचायत हरकूळखुर्द) तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व भेटवस्तू देऊन करण्यात आला. प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या कु.स्वराली विलास भोसले हिने आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्री. धोंडी अण्णा श्री.बाबाजी दळवी व श्री.विठ्ठल रासम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सावंत मॅडम व गांगुर्डे सर व आभार प्रदर्शन श्री पवार सर यांनी केले.