दांडी येथे ६ ऑगस्ट रोजी नारळ लढवणे स्पर्धा

दांडी येथे ६ ऑगस्ट रोजी नारळ लढवणे स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*दांडी येथे ६ ऑगस्ट रोजी नारळ लढवणे स्पर्धा*

*मालवण : प्रतिनिधी*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नारळीपौर्णिमेनिमित्त मालवण दांडी येथे दांडी मर्यादित पुरुषांसाठी नारळ लढवणे स्पर्धा ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा रिक्षा स्टँड याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम -रु. ६६६६, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रु. ४४४४ देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून पुरविले जातील. इच्छुक स्पर्धकांनी ५ ऑगस्टपर्यंत ९४२०७४६३३५ येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!