कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ*

*वेंगुर्ले हायस्कूल येथे माजी मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस्.एस्.काळे सर व माजी विद्यार्थी तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ* .

कोकण कला व शिक्षण विकास हि सेवाभावी संस्था गेली अनेक वर्षे सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्रात कार्यरत असुन विविध शालोपयोगी उपक्रम राबवीत असतात . ह्यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९ शाळांना संस्थेच्या वतीने कमर्शियल वाॅटर फिल्टर देण्यात आले , त्यापैकी वेंगुर्लेत १ महाविद्यालय व ४ हायस्कूल ना वाॅटर फिल्टर देण्यात आले . त्यापैकी वेंगुर्ले हायस्कूल ला देण्यात आलेल्या वाॅटर फिल्टर चा शुभारंभ मा.मुख्याध्यापक काळे सर व माजी विद्यार्थी प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला .
यावेळी कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे आभार मानत प्रसंन्ना देसाई म्हणाले कि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी कोकण विकास संस्थेने आयजीयुस इंडिया या कंपनीच्या सहकार्याने राबविलेला उपक्रम स्तुत्य असुन या उपक्रमामुळे शाळेतील मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. रोग प्रतीकार शक्ती वाढेल व शालेय उपस्थितीत सकारात्मक बदल दिसून येईल .
यावेळी हायस्कूल चे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे सर , आर.डी.केर्लेकर , एस्.आर.कुरणे , सौ.एस्.एल.समुद्रे , एन.आर.तेंडोलकर , ए.व्ही.तेंडोलकर , आर.एस.कांबळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी विद्यार्थ्यांची शुद्ध पाण्याची सोय करून दिल्याबद्दल कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे सरांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!