*कोंकण एक्सप्रेस*
*तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला तालुका तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ २० जुलै रोजी भटवाडी-वेंगुर्ला येथे वैभव तुळसकर यांच्या निवासस्थानी पार पडला. यात दहावी, बारावी तसेच इतर स्पर्धा परीक्षामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक शरद चव्हाण तर अध्यक्षस्थानी अॅड.मनीष सातार्डेकर होते. हा समारंभ वेंगुर्ला तालुका तेली समाजाचे अध्यक्ष प्रा.सुनील नांदोस्कर, सचिव विद्याधर वरस्कर आणि खजिनदार अशोक पेडणेकर यांनी आयोजित केला होता. अॅड. मनीष सातार्डेकर यांनी आपल्या भाषणात पालकांनी आपल्या पाल्याच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलाने त्यांच्या आवडीचे शिक्षण द्यावे असे आवाहन केले तर प्रा.सुनील नांदोस्कर यांनी जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या आणि मराठी माध्यमात शिकल्यामुळे मुलांचा होणारा सर्वांगीण विकास यावर सगळ्यांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाची सांगता कु. सानवी सातार्डेकर हिने ‘कोशिश करने वालों की हार नही होती‘ या कवितेने करून वातावरणात उत्साह भरला. कार्यक्रमाचे निवेदन सीमा तुळसकर यांनी केले तर सीमा वरस्कर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण, तुळस, होडावडे, शिरोडा, रेडी, दाभोली येथील तेली समाजातले अनेक मान्यवर उपस्थित होते.