*कोंकण एक्सप्रेस*
*रामेश्वर मंदिरात श्रीवरदशंकर व्रतपूजा*
*वेंगुर्ला ः. प्रथमेश गुरव*
येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी बहुसंख्य भाविकांनी वरदशंकरव्रत पूजा करून श्रींची सेवा केली.
श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्ये करण्याची प्रथा आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यातील सोमवार आणि गुरूवार या दिवशी श्रीवरदशंकर व्रतपूजेंचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी शेकडो भाविकांनी वरदशंकरव्रत पूजा करून श्रींचरणी सेवा केली. यानिमित्त श्रींच्या गर्भगृहात पुष्पपूजा, संगीत भजन मंडळ त्यानंतर पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली.
फोटोओळी – रामेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी वरदशंकरव्रत पूजा करण्यात आल्या.