*कोंकण एक्सप्रेस*
*विठ्ठल रखुमाईची आकर्षक शेषशाही पूजा*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
भुजनागवाडी विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या अखंड भजनी सप्ताहाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचे औचित्य साधून विठ्ठल रखुमाईची आकर्षक शेषशाही पूजा बांधण्यात आली.
वेंगुर्ला येथील भुजनागवाडी विठ्ठल मंदिरात २५ जुलैपासून अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त मंदिरात रोज विविध संगीत व वारकरी मंडळांची भजने संपन्न होत आहे. आज मंगळवारी नागपंचमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाईची शेषशाही पूजा बांधण्यात आली. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिरात उपस्थिती दर्शवित आहेत. गुरूवार दि. ३१ रोजी रात्रौ दिडी कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला बाजारपेठेत विठ्ठल रखुमाईची पालखी प्रदक्षिणा होऊन काल्याने अखंड भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे.