प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम हिला “भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार 2025 प्रदान”

प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम हिला “भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार 2025 प्रदान”

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम हिला “भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार 2025 प्रदान”*

*शिरगांव | संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव शेवरे येथील प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम हिला ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न आदर्श प्राध्यापिका चा 2025 चा पुरस्कार ग. दि .माडगूळकर नाट्यगृह पिंपरी चिंचवड पुणे,येथे ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जीवन समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमात देण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम), वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त,मनपा पुणे), श्रीराम मांडरके(अतिरिक्त पोलीस आयुक्त,पुणे),श्रीमती प्राजक्ता मांजुलकर (रील स्टार), कु.श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल)आणि ममता भोई (मिस इंडिया ) ए.डी.फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अशोक गोराड यांचे विशेष उपस्थिती होती.
गेल्या 9 वर्षापासून विद्यार्थ्यांना गुणवत्ता,संधी आणि प्रेरणा देणारी स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेस ही एक उज्वल परंपरा ठरली आहे. जी दरवर्षी नव्या यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे.या क्लासेसच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्वक मार्गदर्शन करत असून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी या सातत्याने प्रयत्नशील आहे. आजवर विविध महाविद्यालय, युनिव्हर्सिटी इतर संस्था व फाउंडेशन मधून विशाखा साटम हिच्या कार्याची दखल घेऊन 350 हून अधिक प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे,गौरवपत्रे या शिक्षण क्षेत्रासाठी प्राप्त झालेली आहे.
या गुणवत्तेवर आधारित वैयक्तिक लक्ष,अध्यापन, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शेकडो विद्यार्थी उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण झाले असून त्यांच्या यशाचा माझा मोलाचा वाटा असल्याचे प्रामाणिक जाणीव त्यांना आहे. शैक्षणिक कार्याची दखल घेऊन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श प्राध्यापिका पुरस्कार 2025 ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित यांच्याकडून शाल,सन्मानपत्र, गौरवचिन्ह व मेडल देऊन गौरवण्यात आले. प्रा. विशाखा साटम हिने अनेक चांगले विध्यार्थी विध्यार्थिनी घडवीले. या तिच्या यशाबद्दल शिरगांव दशक्रोशीत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!