*कोकण Express*
*कणकवलीत विना मास्क फिरणाऱ्यावर कणकवली पोलिसांची धडक कारवाई..*
*कणकवली शहरात पेट्रोलिंग करत तब्बल २२ जणांवर केली कारवाई;चार हजार ४हजार ४०० रुपयांचा दंड वसूल….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात रविवार मार्केट बंद असते. तरीदेखील विनाकारण काही नागरिक व दुचाकीवर तरुण फिरत असतात. त्यामुळे कणकवली पोलिसांनी विशेष मोहीम पटवर्धन चौक,रेल्वे स्टेशन रोड, बाजारपेठ व शहरात व नाक्यानाक्यांवर राबवली. त्यात विना मास्क व नियम तोडणाऱ्या तब्बल २२ जणांवर दुपारपर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे. या लोकांकडून ४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या पोलिसांच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.खडांगळे,पोलीस पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.चव्हाण, वाहतूक पोलीस संदेश आंबिटकर ,पोलीस किरण मेथे, हवालदार रविंद्र बाईत आदींची सहभाग होता.