*कोंकण एक्सप्रेस*
*सिधुदुर्गस्थानकावर पिआरएस जलदगाड्यासाठी आम्ही ठाम
कोकणरेल्वे प्रवाशी संघर्ष समन्वय समितीचा पवित्रा*
*सिधुदुर्गनगरी*
सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे स्टेशन असून पोस्ट मधील तिकीट मिळणे बंद आहे प्रवाशाना तिकीट मिळत नाही तर येथे असलेली यंत्रणा काढून त्या ऐवजी सिधुदुर्ग या स्टेशनवर तिकीट पि .आर .एस सिस्टीम असणे आवश्यक आहे प्रवाशी संख्या वाढीच्या , प्रवाशांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दावर ठाम असल्याचे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघटनेच्या वतीने उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले
. सिंधुदुर्ग कोकण रेल्वेस्टेशनवर येथील आंदोलनाच्या दरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्याने प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या कमवेत भेट घेऊन काही साफसफाई पाण्याचा निचरा पाणीपुरवठा मोडलेले बेंच आणि अन्य सोयी सुविधा बाबत पाहणी केली गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे मोठ्या प्रमाणात येणारे चाकरमाने लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधांसाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघर्ष समितीच्या माध्यमातून येत्या एक ऑगस्ट रोजी जना आंदोलन आयोजित केले आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांनी कालपासून कार्यपटन ते कणकवली दरम्यान स्टेशनची पाहणी केली व आज सिंधुदुर्ग स्टेशनवरपाहणी केली या पाहणी मध्येकोकण रेल्वेचे श्री मधुकर मातोंडकर श्री शैलेशअंबाडेकर विजय सामंतवीज इंजिनियर चिन्मय अंधारीश्री प्रकाश श्री प्रकाश रानबांबुळी सरपंच परशुराम परबकोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर सचिव अजय मयेकर नागेश ओरोसकर स्वप्नील गावडे त्यांच्यासह संघटनेचे पदाधिकारीरिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी स्टेशनच्या दुतर्फा रानसाफसफाई तसेच मोडलेले बेंच सुशोभीकरण परिसर साफसफाई स्टेशनवरील पाण्याचीगळती शौचालय स्वच्छताअशा सोयीसुविधा ची पाहणी केली यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पोस्ट विभागातील बंद असलेली पी आर एस तिकीट यंत्रणेची पाहणी केली. नेट कनेक्टिव्हिटी आणि थेट कोकण रेल्वे कडूनच ही कनेक्टिव्हिटी बंद असल्याचे पोस्टाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे येथील यंत्रणा बंद आहे यातील समितीच्या पदाधीकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्या समवेत तिकीट फार्म भरले असता बंद आहे असे संबंधीत पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले हे गेली कित्येक महिने सुरू असून प्रवाशाना पोस्टात तिकीट मिळत नाहीत्यामुळे आम्ही नियंत्रणा सिधुदुर्ग स्टेशनवर कोकण रेल्वेच्या तिकीट काउंटर वरच सुरू करावी अशी मागणी प्रवासी समन्वय संघटनेने केली आहे कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने सोई सुविधा जलद गाड्यांना थांबा आणि तिकीट . पिहारएससिस्टीमअद्यावत व्हावी या मुद्द्यावर ठाम असून सर्व स्टेशनच्या प्रश्नांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन कायम आहे असेही कोकण रेल्वे प्रवासी समन्वयव संघर्ष संघटनेचेअध्यक्ष प्रकाश पावस्कर यांनी स्पष्ट केले आहे (फोटो)
सिधुदुर्ग स्टेशन येथील समस्याबाबत माहिती घेताना रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व प्रवासी समन्वय सघटनेचे पदाधिकारी