*कोंकण एक्सप्रेस*
*उद्योजक पराग नलावडे यांचा शिवसेनेत प्रवेश*
*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*
*मालवण ः प्रतिनिधी*
आचरा येथील रहिवासी आणि प्रसिद्ध नलावडे समोसाचे मालक उद्योजक माजी केंद्रप्रमुख पराग नलावडे यांनी आचरा येथे सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी त्यांच्या सोबत दादा साहिल, संतोष कोदे,विश्वास गावकर तालुकाध्यक्ष विनायक बाईत दीपक पाटकर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस ,उपसरपंच संतोष मिराशी, अरविंद करलकर, परुळेकर डॉ. प्रमोद कोळंबकर ,मुजफ्फर मुजावर ,अभिजीत सावंत ,निलेश बाईत,प्रशांत परब,चंद्रकांत कदम, महेंद्र घाडी, दत्ता वराडकर, किशोर हिर्लेकर यांसह बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित.