मुलांनी मिळविलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पालकांनीही समाज जागृतीसाठी पुढे यावे : नूतन जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली

मुलांनी मिळविलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पालकांनीही समाज जागृतीसाठी पुढे यावे : नूतन जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली

*कोंकण एक्सप्रेस*

*मुलांनी मिळविलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पालकांनीही समाज जागृतीसाठी पुढे यावे : नूतन जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली*

*सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचा कणकवली येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार*

*शिरगांव | संतोष साळसकर*

आपण मिळवलेले हे यश समाजाच्या दृष्टीने व आपली प्रगतीच्या दृष्टीने उल्लेखनीय असून आपण घेत असलेल्या या शिक्षणातून पुढे अधिका अधिक तांत्रीक शिकणातून प्रगती साधा, पालकांनीही समाज संघटन व विविध उपक्रमांसाठी प्रोत्साहन देऊन समाज जागृतीसाठी प्रेरणा द्यावी अधिक संघटीत होऊन व तळागाळामध्ये विविध शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी मदत करावी असे आव्हानात्मक प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली यांनी केले.

कणकवली येथील उकर्षा हॉटेल हॉलमध्ये सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नतीमंडळ गुणवंत विद्यार्थी सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन व संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली यांच्या हस्ते पुष्प हार घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम झगडे व चंद्रकांत तेली यांनी केले. तर सूत्रसंचालन दत्ताराम हिंदळेकर यांनी केले. यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुनश्च तुकाराम तेली यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. तर उपाध्यक्ष निलेश कामतेकर सचिव पदी संजय कवटकर, सहसचिव भालचंद्र आजगावकर, खजिनदार दत्ताराम हिंदळेकर व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी दहावी, बारावी, पदवीधर आणि उल्लेखनीय काम केलेल्या अशा व्यक्ती अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक शालांत मध्ये युवराज गुरुदास आजगावकर, सात्वीक मालडकर, योगिता मुळदेकर, गौतमी आरोलकर, वेदांत फोंडेकर, देवयानी आंबेरकर, प्रणव डीचोलकर, श्रुती डिचोलकर, मंदार साळस्कर, तर बारावी मध्ये सलोनी तेली, शुभम तिवरेकर, श्रुती पिंगुळकर, जान्हवी आंबेरकर, दीप्ती हिंदळेकर, विवेक विनय वालावलकर, मानसी डिसोलकर, सोनल वेंगुर्लेकर, मनीष वायंगणकर, भक्ती वायंगणकर, सोहम साताडेकर, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त अन्नपूर्णा राघोबा आजगावकर, नम्रता नितीन तेली, सौं. शुभांगी तुकाराम तेली, वैष्णवी उमरसकर, उज्वल यशस्वी समाज बांधवांमध्ये मनस्वी वालावलकर, सरपंच रामगड शुभम मटकर, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, काशिनाथ कसालकर, भाऊ सातार्डेकर यासह विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच आर्थिक शैक्षणिक मदतीमध्ये मनस्वी वालावलकर, चिन्मय मटकर, नम्रता तेली, चेतन मटकर, साक्षी तेली, तनवी तेली, चंद्रशेखर झगडे, गायत्री खानविलकर, प्रिया तेली, प्रिया खानविलकर आदींचा सत्कार करण्यात आला
यावेळी एकनाथ तेली, दशरथ कवटकर, सुप्रिया वालावलकर, नांदोस्कर, शुभम मटकर आदींची भाषणे झाली

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना तुकाराम तेली म्हणाले आपण गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळलेले प्राविण्य हे वाखण्यजोगे आहे. अशीच प्रगती साधू समाजाचे नावलौकिक वाढवावेव समाजाच्या अशा उपक्रमाला सहकार्य आणि प्रोत्साहन देऊन समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व सध्याच्या युगात अनेक तांत्रिक ज्ञानाचा फायदा घेऊन नोकरीच्या बरोबर रोजगार स्वयंरोजगारासाठी प्रगती साधा अनेक क्षेत्रात प्रातिष्य मिलता अशादी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!