श्रावण सोमवार निमित्त भाविकांच्या स्वागतासाठी कुणकेश्वर सज्ज

श्रावण सोमवार निमित्त भाविकांच्या स्वागतासाठी कुणकेश्वर सज्ज

*कोंकण एक्सप्रेस*

*श्रावण सोमवार निमित्त भाविकांच्या स्वागतासाठी कुणकेश्वर सज्ज*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होणार असून २८ जुलै २०२५ व दिनांक ०४ ऑगस्ट ११ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२५ या चारही श्रावणी सोमवारी येणाऱ्या भाविक भक्ताकारीता सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजां संपन्न होत असते उद्या दिनांक २८ जुलै २०२५ पहिल्या सोमवारी पहिल्या पूजेचा मान श्री सुरेश नेरुरकर – प्रसिद्ध उद्योजक मालवण आणि श्री आनंद शिरवलकर – प्रसिद्ध उधोजक कुडाळ यांना देण्यात आला आहे. प्रत्येक सोमवारी प्रथम पुजा झाल्यानंतर सकाळी सुमारे ०६:०० वाजता दर्शन रांगा चालु करण्यात येतील याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी प्रतिवर्षाप्रमाणे रा.प.म. देवगड आगार यांच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त स्पेशल देवगड कुणकेश्वर तसेच रत्नागिरी सावंतवाडी कणकवली येथून जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरामध्ये सकाळी ०६ : ०० ते रात्रौ ०८:०० या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित भजनी मंडळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसुविधा व दर्शन व्यवस्था नियोजन ट्रस्ट वतीने करण्यात आले असून सर्व भाविक, भक्त, पर्यटक यांनी देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष श्री एकनाथ केशव तेली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!