*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे व बिस्किटे वाटप व रक्तदान शिबिर संपन्न*
*वैभववाडी प्रतिनिधी*
शिवसेना उबाठा चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे दत्त मंदिरात तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी अभिषेक करत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभो यासाठी सर्व निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ईश्वर चरणी प्रार्थना केली. त्यानंतर शिवसेना उबाठाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी नुसार प्रथम समाजकारण मग राजकारण याप्रमाणे आम्ही शिवसैनिक समाजहित व सामाजिक भान लक्षात घेऊन काम करत आहोत असे मत उद्घाटनप्रसंगी अतुल रावराणे यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे बंधूनी घेतलेल्या मराठी भाषेबाबतच्या निर्णयाचे कौतुक करत उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांचे आभार मानले. मराठी ही आपली मातृभाषा असून प्रांत रचनेनुसार तिचा दर्जा हा श्रेष्ठ असून तीचा आपण गौरव केला पाहिजे. त्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा तर इंग्लिश व्यापारी भाषा म्हणून त्यांचा स्विकार केला पाहिजे. असे हि ते म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावणाणे, नगरसेवक मनोज सावंत, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर, यशवंत गवाणकर, सूर्यकांत परब, झुंझार काझी, रवींद्र रावराणे, धाकोजी सुतार, यशवंत सुर्वे, नितेश शेलार , बाबू सरवणकर, राजेश तावडे, विठोबा गुरव, योगेश पवार, प्रमोद लोके, अनंत नांदसकर, अनिल कदम , दीपक पवार, संतोष कडू तसेच , आदी कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरास सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडीचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, सचिव मंदार चोरगे, पत्रकार संजय शेळके.जिवनधारा ब्लड बँक कोल्हापूरचे डॉ.नयनीश मोरे सहकारी सुनिल कांबळे, रोहित गायकवाड, समृद्धी दळवी, ऋतुजा चौगले यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीरात सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.