*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष म्हणून रविकिरण गवस यांची नियुक्ती……*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघात तरुण युवकांची फळी निर्माण करण्यासाठी तरूण तडफदार पदाधिकारी रविकिरण गवस यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे मतदार संघात नवे चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या आदेशानुसार नियुक्ती पञ रविकिरण यांना देण्यात आले.
रविकिरण गवस हा तरुण युवक गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मध्ये चांगले काम करत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार यांच्या प्रचारासाठी काम केले होते. शिवाय मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, तालुक्यातील मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग रविकिरण गवस यांच्या सोबत आहे. शिवाय काम करण्याची पद्धत चांगली आहे.
रविकिरण गवस यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच खासदार, सुप्रिया सुळे, लोकनेते सुरेशभाई दळवी, जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष जबाबदारी रविकिरण गवस यांच्यावर सोपवली आहे.
दोडामार्ग येथे आयोजित मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, सुरेशभाई दळवी यांच्या हस्ते हे नियुक्ती पञ रविकिरण गवस याना देण्यात आले.
यावेळी रविकिरण गवस यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पक्ष वाढला पाहिजे तसेच बेकार युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी येथे उद्योग व्यवसाय सुरू झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मतदार संघातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असे रविकिरण गवस यांनी सांगितले.