वेंगुर्लेत आंबापेटी वाहतुकदारांना ९३ रूपये प्रतिपेटी दर मंजूर

वेंगुर्लेत आंबापेटी वाहतुकदारांना ९३ रूपये प्रतिपेटी दर मंजूर

*कोकण Express*

*वेंगुर्लेत आंबापेटी वाहतुकदारांना ९३ रूपये प्रतिपेटी दर मंजूर…*

*भाडेवाढीवरून सुरू असलेला संप अखेर मागे…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

वेंगुर्ले मध्ये आंबा पेटी वाहतूक दरावरून गेले चार पाच दिवस वाद सुरू होता. अखेर ट्रान्सपोर्ट, आंबा बागायतदार आणि वाहतूकदार यांच्या संयुक्त बैठकीत पेटीला 93 रुपये दर देण्याच्या निर्णयाला सर्वानुमते सहमती मिळाल्याने हा वाद मिटला, असे ट्रान्सपोर्ट महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी घोगळे यांनी जाहीर केले. त्यामुळे मालवाहतूकदार टेम्पो चालक मालक संघटनेचा संप मिटला आहे.
येथील साईमंगल कार्यालयात काल गुरूवारी सायंकाळी आंबापेटी वाहतुक भाडेवाड दरासंदर्भात योग्य निर्णय न झाल्याने वाहातुक दरांनी संप पुकारला होता. सद्यस्थितीत डिझेलचे भाव वाढल्याने प्रतिपेटी वहातुकिचा खर्च भागत नसल्याने आंबा ट्रान्सपोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदार यांच्या संयुक्त तातडीची बैठक आयोजीत करण्यांत आली होती. सदरची बैठक ट्रान्सपोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांच्या अध्यक्षतेखाली व महासंघाचे पदाधिकारी मनोज वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत आंबा ट्रान्सपोर्ट मालक, वाहतुकदार व आंबा बागायतदार शेतकरी यांच्यात अंतिम चर्चा होऊन 93 रूपये प्रति पेटी दर देण्यांचा तसेच रस्सीचे पैसे स्वखुशीने देण्यात यावे. त्याचप्रमाणे वहातुकिसाठी वेंगुर्लेतील गाडय़ांना प्राधान्य देण्यांत यावे. असा निर्णय सर्वानुमते घेण्यांत आल्याचे ट्रान्सपोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहिर केले.
या बैठकिस चर्चेत सहभाग घेतलेल्यात आबा ट्रान्सपोर्ट मालकांत रामेश्वर आंबा सर्व्हीसचे मालक जनार्दन पडवळ, लता गुड्स ट्रान्सपोर्टचे मालक जगन्नाथ सावंत, सिध्दीविनायक ट्रान्सपोर्टचे मालक श्याम कौलगेकर, वेंगुर्ला ट्रान्सपोर्टचे मालक दादा गावडे, आंबा व्यापारी विरेंद्र कामत-आडारकर, नागेश उर्फ पिंटय़ा गावडे, निलेश चमणकर, यशवंत उर्फ बाळू परब, गजानन वेर्णेकर, अनिल मांजरेकर, बाळा मांजरेकर, गिरीष मांजरेकर, प्रताप आसोलकर, चेतन पेडणेकर, नारायण पेडणेकर, बबलू कुबल, संदेश निकम, अजित राऊळ, कांबा काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर तसेच ट्रान्सपोर्ट संघटनेचे शिवाजीराव घोगळे, मनोज वालावलकर, शरद वालावलकर, वेंगुर्ला टेम्पो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संदिप पेडणेकर, सोनू शेख, गोल्डन फर्नाडीस, उदय चिपकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!