*कोकण Express*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतली कोरोना लस*
*जिल्हावासीयांनी कोव्हीड लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील उपस्थित होते.
केंद्र शासनाने 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने कोरोना लसीकरण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. आज भाजपा जिल्हाध्यक्ष तेली यांनी कोरोना लस टोचून घेतली. शासनाच्या निकषात बसणाऱ्या सर्व सिंधुदुर्गवासीयांनी कोरोना लसीकरण करून घेण्याचे तेली यांनी आवाहन केले.