*कोकण Express*
*वैभववाडी तालुका भाजपाची दि.५ एप्रिल रोजी बैठक*
*भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांचे नियोजन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
६ एप्रिल हा दिवस भाजपा स्थापना दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपच्या वतीनेही स्थापना दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वैभववाडी तालुका भाजपाची बैठक सोमवार दि. ५ एप्रिल रोजी
पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. स्थापना दिनानिमित्त गावातील बुथवर, तसेच गावा गावातील चौकात, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरासमोर पक्षाचा ध्वज उभारण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सरपंच यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नासीर काझी यांनी केले आहे.