एस्.एम.प्रशालेमध्ये शिक्षक-पालक सभा संपन्न

एस्.एम.प्रशालेमध्ये शिक्षक-पालक सभा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*एस्.एम.प्रशालेमध्ये शिक्षक-पालक सभा संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील एस. एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालेमध्ये शनिवार दि. 19/07/2025 रोजी शिक्षक-पालक सभा संपन्न झाली. वंदनीय कै.पारकर साहेब सभागृहात संपन्न झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन.बोडके होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत करून उपस्थित पालकांमधून पुरुष व महिला पालक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले.
यानंतर दहावी वर्गशिक्षिका सौ एस.एस.पाटकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये हेतू विशद करून शिस्त, उपस्थिती व प्रगती या बाबींवर प्रामुख्याने मार्गदर्शन केले. यानंतर पर्यवेक्षक जी.ए.कदम यांनी यावर्षीपासून नवीनच सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्रे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर ए.के. हाके, सौ.एस.सी. मयेकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी व मेहनत यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक जी एन बोडके यांनी शाळेतील विविध उपक्रम व प्रगतीच्या चढत्या आलेखाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे पालकांनीही आपली मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस. एस. पाटकर यांनी केले तर आभार सौ पी.पी. पराडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!