*कोंकण एक्सप्रेस*
*गांजा बाळगल्या प्रकरणी कुडाळ येथील विशाल सुरेश वाडेकर यास ओरोस सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर..*
*ॲड. अशपाक शेखयांनी मांडली वाडेकर याची बाजू..*
काही दिवसापूर्वी कुडाळ येथून गांजा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशाल सुरेश वाडेकर याची आज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी ५० हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर व अटी शर्तीवर जामिनावर सोडण्याचा आदेश केला. यावेळी ॲड. अशपाक शेख, यांनी काम पाहिले.
विशाल वाडेकर यास कुडाळ पोलिसांनी गांजा प्रकरणी अटक केल्यानंतर अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आले होते. आरोपी विशाल वाडेकर याच्यावतीने युक्तिवाद करताना, आरोपीकडून पोलिसांनी कधीही गांजा जप्त केला नसून प्रथम खबरी नुसार त्याच्याकडून बिया जप्त केल्याचे निदर्शनास येत असल्याने तसेच “गांजा बिया” या नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याप्रमाणे गांजाच्या व्याख्येत बसत नसल्याने पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला आहे असा युक्तिवाद केला . तो युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानला आणि आरोपीची काही अटी शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.