*कोंकण एक्सप्रेस*
*माजी नगरसेवक खोत यांच्या पाठपुराव्यामुळे भरड व तारकर्ली नाका येथील हायमास्ट टॉवर अखेर प्रकाशमान..*
*मालवण, दि प्रतिनिधी*
मालवण शहरातील भरड नाका व तारकर्ली नाका येथील बंदावस्थेत असलेले दोन्ही हायमास्ट टॉवर कार्यतत्पर माजी नगरसेवक यतीन खोत यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रकाशमान झाले आहेत. दोन्ही हायमास्ट टॉवर कार्यान्वित झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मालवण शहरातील मुख्य भरड नाका येथील तसेच तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य नाक्यावरील हायमास्ट टॉवर गेले काही महिने बंदावस्थेत होते. हायमास्ट टॉवर बंद असल्याने रात्रीच्या वेळी भरड तसेच तारकर्ली नाका परिसर अंधारमय बनला होता. परिणामी नागरिकांना काळोखातून या मार्गावरून जावे लागत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधताच त्यांनी तत्काळ पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत हे दोन्ही हायमास्ट टॉवर पुन्हा कार्यान्वित करून घेतले आहेत. येत्या काळात सणांना सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच हे दोन्ही हायमास्ट टॉवर प्रकाशमान झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवक या तीन खोत यांचे आभार मानले आहेत.