*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा 26 व 27 जुलै 2025 रोजी*

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा 26 व 27 जुलै 2025 रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा 26 व 27 जुलै 2025 रोजी*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन , यांच्या संयुक्कत विध्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा योगासन निवड चाचणी – 2025-2026 शनिवार, दि. 26 व 27 जुलै 2025 रोजी ओरोस जिजामाता हॉस्पिटल हॉल येथे आयोजित केल्या आहेत.
तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या दोन दिवस आधी पर्यंत ( गुरुवार, दि. 24 जुलै 2025 पर्यंत) सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टने दिलेल्या खालील गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. दिनांक 24 जुलै 2025 नंतर नोंदणी केलेल्या स्पर्धकांना, स्पर्धा खेळता येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdUwJSutr_18MMN1omXAj0GnzCPbN_r5Wzl195Kx5fZloMT6w/viewform?usp=header
(स्पर्धेच्या दिवशी वेळेवर नोंदणी न करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.)
स्पर्धेची वेळ :- सकाळी 09:30 वाजता ते 11:30 पर्यंत प्रवेश नोंदनी
स्पर्धेचे ठिकाण :- ओरोस जिजामाता हॉस्पिटल हॉल,तालुका कुडाळ
स्पर्धे करिता कट ऑफ डेट 01/01/2025 राहिल.
ही स्पर्धा खालील दहा प्रकारात होईल* –
१) ट्रॅडिशनल योगासन
२) आर्टिस्टिक योगासन सिंगल
३) आर्टिस्टिक योगासन पेअर
४) रिदमिक योगासन पेअर
५) फॉरवर्ड बेंड इंडिव्हिज्युअल इव्हेंट
६) बॅक बेंड इंडिव्हिज्युअल इव्हेंट
७) हॅन्ड बॅलेन्स इंडिव्हिज्युअल इव्हेंट
८) लेग बॅलेन्स इंडिव्हिज्युअल इव्हेंट
९) ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल इव्हेंट
१०)सुपाइन इंडिव्हिज्युअल इव्हेंटिसिनयर
सीनियर A.B.C गटातील खेळाडू आर्टिस्टिक योगासन सिंगल आर्टिस्टिक योगासन पेअर रिदमिक योगासन पेअर या इव्हेंट मध्ये भाग घेऊ शकणार नाहीत
सीनियर A.B.C गटातील खेळाडू स्पर्धा या 26 जुलै 2025 रोजी होतील
सब ज्युनियर, ज्युनियर व सीनियर गटाची स्पर्धा 27 जुलै 2025 रोजी होतील
स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होईल.स्पर्धक एक किंवा दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात अशी महिती श्री चंद्रशेखर खापणे व श्री सुरेश जाजू यांनी दिली.
२.स्पर्धेसाठी वयोगट-
१) सब ज्युनियर गट- 10+ वर्षे ते 14 वर्षे मुले व मुली (जन्मदिनांक 31-12-2014 ते 01-01-2011 पर्यंत)
२) ज्युनियर गट -14+ वर्षे ते 18 वर्षे मुले व मुली (जन्मदिनांक 31-12-2010 ते 01-01-2007 पर्यंत)
३) सिनियर 18 + वर्षे ते 28 वर्षे मुले व मुली (पुरुष व महिला) (जन्मदिनांक 31-12-2006 ते 01-01-1997 पर्यंत)
4) सिनियर अ गट 28+ वर्षे ते 35 वर्षे (पुरुष व महिला) (जन्मदिनांक 31-12-1996 ते 01-01-1990 पर्यंत)
5) सिनियर ब गट 35+ वर्षे ते 45 वर्षे (पुरुष व महिला) (जन्मदिनांक 31-12-1989 ते 01-01-1980 पर्यंत)
6) सिनियर क गट 45+ वर्षे ते 55 वर्षे (पुरुष व महिला) (जन्मदिनांक 31-01-1979 ते 01-01-1970 पर्यंत)
३.स्पर्धा प्रवेश शुल्क:-
प्रतिस्पर्धक-100/- (प्रवेश फी) *प्रत्येक प्रकारासाठी – 100/-
खेळाडू ट्रॅडिशनल योगसन स्पर्धा आणि आर्टिस्टिक योगासन सिंगल स्पर्धेत सहभागी होणार असेल त्यांना 100 + 100 = 200/- फी भरावी लागेल.
नोट-आर्टिस्टिक योगासन पेअर आणि रिदमिक योगासन पेअर मध्ये भाग घेणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
४.गुगल फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलांनुसार पेमेंट पूर्ण करा.
५.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी पुढील कागदपत्रे सादर करावीत.
१) आधार कार्डची फोटो कॉपी
२) वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र)
३) एम.बी.बी.एस., बी. एच. एम .एस., बी एम. एस. डॉक्टर फिटनेस प्रमाणपत्र
४) पासपोर्ट आकाराचा फोटो
५) जोखीम प्रमाणपत्र
(स्पर्धेदिवशी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी वरील कागदपत्रे जमा करावीत.)
टीप:
१.पंचांचा निर्णय अंतिम राहील
अधिक माहिती साठी ससंपर्क
श्री डॉ.राव राणे – 9423879334 / 7083602504
सौ डॉ.मोऱे – 7774876395
श्री प्रकाश कोचरेकर – 9423879133
श्री संजय भोसले – 9420155134
सौ श्वेता गावडे – 84882850309
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व खुल्या गटातील सर्वांनी आप आपल्या वयोगटानूसार जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आयोजकांमार्फत आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व शाळांच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहीत करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!