*कोंकण एक्सप्रेस*
*कै. सतीश सामंत यांच्या कन्येचे CA परीक्षेत दैदिप्यमान यश! डीलर असोसिएशनकडून सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील इलेक्ट्रॉनिक्स डीलर कै. सतीश सामंत(सामंत इलेक्ट्रॉनिक्स) यांची कन्या कु. श्वेता सामंत यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा उच्च श्रेणीतून उत्तीर्ण करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल डीलर असोसिएशनने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हे यश खरोखरच कौतुकास्पद आणि अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी, डीलर असोसिएशनतर्फे नीलीशा इलेक्ट्रॉनिक्स, राणे इलेक्ट्रॉनिक्स, आर. के. इलेक्ट्रॉनिक्स आणि पुजारी इलेक्ट्रॉनिक या प्रतिनिधींनी त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.
या यशाबद्दल डीलर असोसिएशनने सामंत यांच्या कन्येचे खूप कौतुक केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून सदिच्छा दिल्या आहेत.