*कोंकण एक्सप्रेस*
*भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा २६ जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ*
*मालवण (प्रतिनिधी)*
भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वा. मालवण बाजारपेठ येथील संस्थेच्या भंडारी हॉल (भंडारी हायस्कूल सभागृह) येथे संपन्न होणार आहे.
या समारंभाच्या पूर्वी सकाळी ९ वा. माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध संगीतकार गायक शिवहरी रानडे यांचा संगीत कार्यक्रम सादर होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून चराठा सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत- भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आजी – माजी विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. तसेच ‘सुवर्णभरारी’ या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. तर दुपारी स्नेहभोजन होणार आहे.
तरी या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक विभाग, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व माजी विद्यार्थी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.