*कोंकण एक्सप्रेस*
*असलदे येथील शिवशंकर पार्वती कृषी पर्यटन रिसॉर्टला विनोद तावडे यांनी सपत्नीक दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, तुकाराम उर्फ बाबू रासम ,गोविंद तावडे यांच्या शिवशंकर पार्वती कृषी पर्यटन रिसॉर्टला आज सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा पंढरी वायंगणकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यापूर्वी ४ हजार काजूंची लागवड केलेल्या या बागेत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही या बागेला भेट दिली. ७ नंबर ओल्या काजू गर साठी प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये पाहणी केली. हे ओले काजू गर बाहेर इतरत्र जात असतात.
यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ , बंड्या सावंत , विठ्ठल खरात , शामराव परब ,पप्पी वायंगणकर , पांडुरंग मर्तल, निसार पाटणकर, श्री आठले, अरुण गावकर आदी उपस्थित होते.