*कोंकण एक्स्प्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :-*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे मंगळवार 22 जुलै 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे सिटीस्कॅनच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ :- उपजिल्हा रुग्णालय, कणकवली), सकाळी 10.00 वाजता मुख्यमंत्री चषक-2025 भजन स्पर्धेस उपस्थिती (स्थळ :- कुडाळ), सकाळी 11.00 वाजता पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उपस्थिती, (स्थळ :- कणकवली कॉलेज, कणकवली), दुपारी 12.30 वाजता देवगड जामसंडे नगरपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाच्या भूमिपुजनास उपस्थिती, (स्थळ :- देवगड जामसंडे, ता. देवगड), दुपारी 2.00 वाजता नापणे धबधबा उद्घाटनास उपस्थिती (स्थळ :- नापणे, ता. वैभववाडी).
०००००