*कोकण Express*
*कणकवली येथील कोरोनामुळे दोघांचा मृत्यू*
*जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती*
*आज नव्याने ६७ रूग्ण आढळले…*
*सिंधुदुर्गनगरी ता.०३:*
जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ६७ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर कणकवली येथील दोघा वृध्दांचा मृत्यू झाला आहे.यात एक ६२ तर दुसरा ७२ वर्षीय रुग्णांचा समावेश आहे.त्या दोघांना उच्चरक्तदाबाचा त्रास होता.याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडुन देण्यात आली आहे.