*दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिष्ठेचा श्री.जी.के.पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार दयानंद मांगले याना प्रदान*

*दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिष्ठेचा श्री.जी.के.पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार दयानंद मांगले याना प्रदान*

*कोंकण एक्सप्रेस*

*दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिष्ठेचा श्री.जी.के.पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार दयानंद मांगले याना प्रदान*

*प्रशांत वाडेकर : देवगड*

महाराष्ट्र कर्नाटक मधील जैन समाजाची गेली १२६ वर्षे,अव्याहतपणे सामाजिक शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रात संस्कार ,शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या दक्षिण भारत जैन सभा या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा जी के पाटील “आदर्श पत्रकारिता पुरस्कार”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दयानंद यशवंत मांगले याना सोमवारी प्रदान करण्यात आला आहे.सन्मानपत्र सन्मान चिन्ह ,धनादेश शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दक्षिण भारत जैन सभा १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन व दक्षिण भारत जैन सभा विविध पुरस्कार वितरण सोहळा दि .२१ जुलै रोजी श्री आदिनाथ समुदाय भवन अथणी गोकाक मेनरोड हारुगेरी ता.रायबाग जि. बेळगावी या ठिकाणी अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील (अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा)यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे,नाम.सतीश एल जारकीहोळी (सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री बेळगावी),नाम.डी. सुधाकर (नियोजन आणि सांख्यिकी मंत्री कर्नाटक राज्य), यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार डॉ प्रभाकर कोरे,(चेअरमन केई एल सोसायटी बेळगावी),आम .राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ) आम.अभय पाटील(दक्षिण बेळगावी चेअरमन रावसाहेब पाटीलउत्तम पाटील व्हॉइस चेअरमन दत्ता डोर्ले डॉ अजित पाटील,संजय शेटे,अरविंद मजलेकर , शीतल पाटील कोल्हापूर मठाचे महास्वामी भट्टारक लक्ष्मीसेन महाराज आणि नांदनी मठाचे भट्टारक महास्वामी जिनसेन महाराज तसेच व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यांच्या हस्ते दीप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन माजी उपमुख्यमंत्री आम.लक्ष्मण सवदी कर्नाटक,स्मरणिका प्रकाशन करण्यात आले आमदार महेंद्र कल्लाप्पा तमन्नावर,(कुडची विधानसभा) कर्नाटक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी समाजातील आरोग्य शिक्षण ,सामाजिक,उद्योग व्यवसायातील अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास कोकण विभाग सदस्य अजित शिराळकर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमोल साळवी,सुनील त्रिभुवणे, चंद्रप्रभ उर्फ नाना बोगार, राजू पिंपळे यांनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!