विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी नाहीतर या कंपन्या वर करवा : मंत्री नितेश राणे

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी नाहीतर या कंपन्या वर करवा : मंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी नाहीतर या कंपन्या वर करवा : मंत्री नितेश राणे*

*सिंधुनगरी प्रतिनिधी*

विमा कंपनी शेतकऱ्यावर उपकार करीत नाही, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही तर या विमा कंपन्यांवर कारवाई तर त्या विमा कंपन्या शासनाकडून बदलून घेऊ अशी तंबी राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्ह्यात ४२२८१ शेतकरी पीकविमा धारक आहेत. हवामानाची आकडेवारी मिळवणं ही जबाबदारी विमा कंपनीची आहे. यात कारणे नको नुकसान भरपाई तातडीने द्या असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत पालक मंत्री नितेश राणे यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती नाईकनवरे, कृषी विद्यापीठ अधिकारी, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, अशोक सावंत जिल्हा बँक सी ई ओ प्रमोद गावडे. आदी उपस्थित होते.
पिक विम्यात सुपारी पिकाचा समावेश नाही. त्याचा समावेश व्हावा अशी मागणी मनीष दळवी यांनी केली. हा निर्णय सरकार घेईल. त्याबाबत कृषी मंत्र्याकडे बैठक घेऊ असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!