कुडाळ एसटी आगारात टेलिफोन व एसटी फेऱ्यांचा सावळा गोंधळ

कुडाळ एसटी आगारात टेलिफोन व एसटी फेऱ्यांचा सावळा गोंधळ

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ एसटी आगारात टेलिफोन व एसटी फेऱ्यांचा सावळा गोंधळ*

*सुरेश बापर्डेकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा*

*मालवण ः प्रतिनिधी*

जिल्ह्यातील कुडाळ एसटी आगारात सावळा गोंधळ सुरु असून तो त्वरीत थांबवावा आणि कायम स्वरुपी नवीन चालू दूरध्वनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केले जाईल, अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

कुडाळ एसटी आगाराचा दूरध्वनी कोरोना महामारी काळापासून सुरु नव्हता तो आजमितीपर्यंत सुस्थितीत नाही. अधून मधुन तिघांचे मोबाईल नंबर बाहेर पेपर फलकावर लावले होते. परंतु तो ज्या आधीकारी वर्ग अगर विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रकजवळ असतो ते कधीच फोन उचलत नाही. रिंग वाजून जाते. मुंबई हून कुडाळ रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी अगर स्टेशनला आल्यावर अगर मालवणहून कुडाळला जायचं असेल तर स्वतःचा फोन असुदे की इतरांच्या फोन वरून केव्हाही मालवण एस टी बस संबंधी विचारपूस करिता फोन केला असता रिंग वाजली तरी फोन उचलला जात नाही. अशावेळी दमून भागून आलेल्या प्रवाशांनी करावं तरी काय? खाजगी वाहन, रिक्षेला भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा की कमी पैशात ? की ताटकळत रेल्वे स्टेशनला राहावं की मालवणला रहाव? याचा खुलासा कुडाळ आगार व्यवस्थापक यांनी त्वरित करावा, अशी मागणी सुरेश बापार्डेकर यांनी केली आहे.

मालवण आगाराच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना काळापासून दूरध्वनी आणि वाहतूक काही अपवाद वगळता आजपर्यंत बंद नाही. कुडाळ पर्यंतची वाहतूकही बंद नाही. मात्र कुडाळ आगारात विचारले तर उलट उत्तरे दिली जातात. तर कित्येकवेळा रेल्वे स्टेशनला न जाता कुडाळ आगारातूनच बस वळविली जाते. याला जबाबदार कोण? कुडाळ- मालवण- कुडाळ एसटी फेऱ्याना प्रवाशांबरोबर शाळा, कॉलेज विद्यार्थी तर कित्येक वेळा सरकारी कर्मचारी असतात. मग अचानक एखादी गाडी कारण नसताना रद्द करणे, उशिरा सोडणे हे प्रवाशांसोबत पर्यटक व इतरांना कितपत परवडणार याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी. प्रवाशांनी लेखी तक्रार पुस्तकात तक्रार केली तर त्याच निरसन होत नाही. याला जबाबदार कोण आहेत, असा सवाल सुरेश बापर्डेकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!