*कोंकण एक्सप्रेस*
*लोकमान्य टिळक विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या बहिस्थ परीक्षांमध्ये विद्यामंदिर कणकवलीच्या दोन विद्यार्थीनी महाराष्ट्रात प्रथम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लोकमान्य टिळक विद्यापीठ, पुणे मार्फत घेतल्या गेलेल्या इंग्रजी प्री-एलिमेंटरी, इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी इंटरमीडिएट व इंग्रजी सीनियर परीक्षांमध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचा निकाल 100% लागला आहे.
इंग्रजी एलिमेंटरी परीक्षेत नंदिनी विजय राणे आणि इंग्रजी सीनियर परीक्षेत अनन्या आत्मबोध जाधव या दोन विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. विद्यापीठामार्फत या दोन विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रशालेचे इंग्रजी विषय शिक्षक विलास ठाकूर आणि वैभवी हरमलकर यांचाही विद्यापीठामार्फत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर परीक्षेला 67 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 54 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
इंग्रजी प्री-एलिमेंटरी परीक्षेत प्रथम-शौर्य दिपक नाचणे, द्वितीय- आरोही रमेश जगदाळे, तृतीय- दिव्या किशोर जंगले, इंग्रजी एलिमेंटरी परीक्षेत प्रथम-आर्या गुरुनाथ वालावलकर, द्वितीय-आरोही मनोज मेस्त्री, परिणिती अनिल ठाकूर, तृतीय-आराध्या महेश पवार, इंग्रजी इंटरमेडिएट परीक्षेत प्रथम-नंदिनी विजय राणे, द्वितीय-मनस्वी मनोज पिळणकर, स्वरा श्रीकृष्ण कोकरे, तृतीय अस्मी प्रसाद राणे, इंग्रजी सीनियर परीक्षेत प्रथम-अनन्या आत्मबोध जाधव, द्वितीय-विधी अभिजीत जाधव, गौरी सुनील खोचरे, तृतीय- सोहम मधुकर कदम, सान्वी रघुनाथ कारेकर, वरदा दत्तप्रसाद मराठे यांनी सुयश संपादन केले.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचा शि.प्र.मं. कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी विजयकुमार वळंजू , अध्यक्ष दत्तात्रय तवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक
डॉ.पी.जे.कांबळे, पर्यवेक्षक ए. व्ही.वनवे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष बाबुराव सावंत सांस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन शेळके, संदीप कदम व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
सदर परीक्षेला प्रशालेचे इंग्रजी विषय शिक्षक
संगिता साटम, विलास ठाकूर, वैभवी हरमलकर, वेदांती तायशेटे
यांनी मार्गदर्शन केले.