आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास याची जोड देत प्रगती साधा जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली

आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास याची जोड देत प्रगती साधा जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली

*कोंकण एक्सप्रेस*

*आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास याची जोड देत प्रगती साधा जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली*

*कुडाळ तालुका तेली समाज गुणवंत विद्यार्थी समाज बांधव सत्कार कार्यक्रम संपन्न*

*सिधुदुर्गनगरी*

तेली समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थी ९०% पेक्षा गुण मिळवून यशस्वी झाले ही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची भूषणावह बाब आहे सध्याआधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्य विकास शिक्षणावर भर दिला जात आहे यावर अधिक भर देऊन याहीपेक्षा आपली प्रगती साधा ,सकारात्मक दृष्टीने तेली समाज संघटना समाजातील कार्यरत असून यासाठी प्रत्येक तरुण समाज बांधवांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्पकरूया असे विचार सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली यांनी व्यक्त केले
कसाल येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे कुडाळ तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि समाज बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होताप्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करूनया कार्यक्रमाचे शुभारंभ दीप प्रज्वलन आणि संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज संघटनेचे अध्यक्ष तुकाराम तेली कुडाळ तालुकातेली समाज संघटनेचे अध्यक्ष दिलीप तीवरेकर सचिव परशुरामझगडे चंद्रकांत तेली मधुकर बोर्डवेकर सुप्रिया वालावलकर रवींद्र कांदळकर बापू तळवडेकर गुरुदास तेलीधोंडू सातार्डेकर हूमरस सरपंच सिताराम तेली गोपाळ वेगुर्लेकर बाळा कांदळकर सुहास आजगावकर रामदास कामतेकरशैलेश डिचोलकर बाळा सातार्डेकर ग्राप सदस्य रश्मी तेली पुजा आंबेरकर प्रशांत आजगांवकर निलेश कामतेकर शिल्पा तेलीआदींसह कुडाळ तालुक्यातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रशांत आजगावकर तर प्रास्ताविक सचिव अमित धामापूरकर यांनी केले
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली यांनी उपस्थितांना ध्यान धारणा हनुमंतमंत्रदेतकाही वेळ मंत्रमुग्न केले यावेळी बोलताना ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज संघटना आज जिल्ह्यात चांगलं काम करत आहे त्यात कुडाळ तालुक्याचे काम वाखाणण्याजोगे कौतुकास्पदआहेतेली समाज आज संघटित बनविण्यासाठी कुडाळ तालुका सह अन्य तालुक्याने ही चांगले काम केले आहेतेली समाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या मुख्यमंत्री गुप्ता यासारखे अनेक मान्यवर माननीय लोकप्रतिनिधी तेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक विचार करून एक चळवळ निर्माण करण्याचा आणि गावागावातील संघटन मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी एक दिलाने करूयातेली समाजात आज अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आधुनिकीतेकडे जोड देणे गरजेचे आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीशैक्षणिक आराखड्यात सहावी आठवी इयत्तेमध्ये कौशल्य विकास आयटी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जावीहाच या मागचा उद्देश आहे विद्यार्थ्यांनी आपले दहावी बारावी या गुणवत्तेनंतर कौशल्य शिक्षण सारख्या तांत्रिक शिक्षणाची जोड द्यावी असे आवाहनही त्यांनी केले .
गेल्या वर्षी आणि यावर्षीचा हा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आपण पार पाडत आहे स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी तांत्रिक शिक्षणाची जोड आवश्यक आहे आजच्या काळात सोशल मीडिया सारखे शिक्षण माहिती तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी वापर केला पाहिजे समाजपयोगी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे शासनाच्या विविध योजना गावातील समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येकहातभार लावत आपल्या समाजाच्या विकासासाठी आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करूया
यावेळीदहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
यामध्ये दहावी मध्ये युवराज गुरुदास आजगावकर सोहम गिरीश बोर्डवेकर अथर्व मिलिंद बोर्डवेकर सोहम अनंत तीवरेकर प्रांजल राकेश तीवरेकर रिया तिवरेकर हर्षदा तेली श्रवण आंबेरकर बारावी मध्ये सलोनी आत्माराम तेली निनाद वेंगुर्लेकर स्मृती तिवरेकर तनया तिवरेकर शुभम तिवरेकरस्पर्धा परीक्षेत जय सातार्डेकर ललित वेंगुर्लेकर गार्गी भालचंद्र आजगावकर कुंजल योगेश पवार सोहम प्रसाद वेंगुर्लेकर अनया महेश वेंगुर्लेकर अथर्व महेश वेंगुर्लेकर पार्थ मयुरेश कांदळकर पदवीधर मध्ये विवेक विनय वालावलकर वेदांत प्रकाश आडेलकरसोनल गोपाळ वेंगुर्लेकर अहिल्याबाई होळकर पुरस्कार अन्नपूर्णा राघोबा आजगावकर वैष्णवी विष्णू मिरजकर मनाली मंगेश वालावलकर पौर्णिमा तेलीसेवानिवृत्त कर्मचारी विजय तेली अजय आंबे रकरसिताराम तेली साईनाथ आंबेरकर अशा विविध क्षेत्रात प्राविण्य घेतलेल्या गुणवंत विद्यार्थी समाजातील व्यक्ती यांचामान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी चंद्रकांत तेली सचिव महेश झगडे सिताराम तेली मधुकर बोर्डवेकरअशा समाजातील विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी उपस्थितांचे आभार सचिव अमित धामापूरकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!