*कोंकण एक्सप्रेस*
*उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जयप्रकाश परब यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या जयप्रकाश अनंत परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. श्री. परब हे कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी यापूर्वी देवगड व वैभववाडी येथे गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यासोबत कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते.