*कोंकण एक्सप्रेस*
*आई नरसुले पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील नरसुले आई समाधी मंदिरात सोमवार दि. २१ जुलै रोजी प.पू.आई नरसुले यांची ४०वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
सोमवारी पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ८ वा. समाधीस अभिषेक, १० वा. ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांचे कीर्तन, दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद, दुपारी ३ वा. विलास दळवी यांच्या हस्ते प.पू.आई नरसुले यांच्या नविन पुस्तकाचे प्रकाशन, दुपारी ३.३० वा. -इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान, ज्येष्ठ नागरीक सन्मान, जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत (कालवीबंदर) स्त्री अभिनय प्रथम क्रमांक प्राप्त वैभवी विठ्ठल सोकटे यांचा आणि सिधुकिरण दिनदर्शिकेच्या शरयू उकिडवे यांचा सन्मान तसेच भरत सातोस्कर, दाजी नाईक, प्रथमेश गुरव, योगेश तांडेल पुरस्कार प्रदान, सायं. ७ वा.-श्री हेळेकर प्रासादिक भजन (कांबळीवाडा) मंडळाचे भजन, रात्रौ ८ वा.श्री ब्राह्मण प्रसादिक भजन (भेंडमळा) मंडळाचे भजन, रात्रौ ९ वा. दादा नाईक भजन (सिद्धेश्वरवाडी) मंडळाचे भजन होणार आहे. तरी सर्वांनी समाधी दर्शनाचा, तीर्थप्रसादाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आई नरसुले समाधी मंदिराचे व्यवस्थापक मोहनदास नरसुले आणि विश्वस्त गजानन नरसुले यांनी केले आहे.
फोटो – आई नरसुले