*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत आजपासून गुरुवंदना कार्यक्रम*
*आदर्श संगीत विद्यालयातर्फे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आदर्श संगीत विद्यालय, कणकवलीच्यावतीने १९ ते २० जुलै या कालावधीत गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवंदना कार्यक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायन, वादनाचा कार्यक्रम चौंडेश्वरी मंदिराच्या लगत संगीत विद्यालयात होणार आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार दीक्षांत देशपांडे, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, माजी नगरसेवक अण्णा कोदे, गजेंद्र कृपाळ, डॉ. मिनल नावगेवकर, डॉ. विवेक रेवडेकर, डॉ. विनय शिरोडकर, डॉ. मुक्तानंद गवंडळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात संगीत शिक्षक बाळा नाडकर्णी, लोककला कलावंत हरिभाऊ भिसे, वादक संदीप मेस्त्री, गायन विशारद श्रुती परुळेकर, कथ्यक विशारद गौरी कामत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार होणार आहे. शनिवार १९ रोजी दुपारी ३ वा. संदीप मेस्त्री यांचा पखवाज वादनाचा कार्यक्रम होईल. रविवार २० जुलै रोजी सकाळी १० वा., दुपारी ३ वा. गायन व वादनाचा कार्यक्रम होईल. तरी संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आदर्श संगीत विद्यालय परिवारातर्फे करण्यात आले आहे.