भजनी कलाकारांची १९ रोजी जामसंडे येथे बैठकदेवगड : प्रशांत वाडेकर

भजनी कलाकारांची १९ रोजी जामसंडे येथे बैठकदेवगड : प्रशांत वाडेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*भजनी कलाकारांची १९ रोजी जामसंडे येथे बैठकदेवगड : प्रशांत वाडेकर*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेची महत्वपूर्ण बैठक १९ जुलै रोजी सकाळी १० वा. जामसंडे येथील श्री दिर्बादेवी- रामेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भजन क्षेत्रातील असणाऱ्या समस्या, तसेच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीमध्ये संस्थाध्यक्ष संतोष कानडे व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीमध्ये कलाकार मानधन, विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन अशा विविध प्रश्नांवर चर्चा करणे व त्यातून मार्ग काढणे. तसेच प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येणार आहे. या बैठकीला देवगड तालुक्यातील सर्व संगीतभजनी, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, झांजवादक, कीर्तनकार व अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!