*कोंकण एक्सप्रेस*
*२०२२ -२३ मधील “त्या” नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; आ. निलेश राणेंच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल !*
*मालवण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील काजू व आंबा शेतकऱ्यांचे 2022-23 मध्ये नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले. मात्र आजतागायत फळपीक विमा योजनेतील नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. मंत्रालय, मुंबई येथे कृषी प्रधान सचिव श्री. विकास रस्तोगी यांच्या दालनात सविस्तर बैठक पार पडली.
शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या त्वरित वितरणासाठी निवेदन सादर करण्यात आले असून लवकरच रक्कम वितरित केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीला माजी मंत्री व आमदार श्री. दीपक केसरकर, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कोकण विभागीय सहसंचालक बालाजी ताटे व इतर अधिकारी उपस्थित होते.
कुडाळ-मालवण मतदारसंघ
आमदार,श्री निलेशजी नारायणराव राणे