यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु: अजयराज वराडकर

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु: अजयराज वराडकर

*कोंकण एक्सप्रेस*

*यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु: अजयराज वराडकर*

*मालवण ः प्रतिनिधी*

आज जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही अश्या वेळी योग्य मार्गदर्शन देऊन जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य गुरू करत असतो.गुरू हा कोणत्याही स्वरूपात असतो.त्यामुळे योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांनी दाखवलेल्या ज्ञानरूपी मार्गावरून जाताना यशाचे शिखर काबिज करू व हा अनमोल वारसा पुढे चालवू असे आशादायी उद्गार गुरुपौर्णिमा व स्वर पौर्णिमा
कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.अजयराज वराडकर यांनी काढले.
या वेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे सचिव श्री सुनील नाईक यांनी गुरु विषयाचे महत्व विषद करताना परम पूज्य साटम महाराज व डॉ.काकासाहेब यांचा संदर्भ दिला.या वेळी गुरू शिष्याच्या नात्याचा उलगडा करताना ज्या ज्या वेळी काकासाहेब यांना समस्या यायच्या अशा वेळी फक्त नामस्मरणाने साटम महाराज यांचा दृष्टांत होऊन समस्यांची सोडवणूक व्हायची याच बरोबर आध्यात्मिक गुरू म्हणून स्वामी शिवानंद यांचा काकासाहेबांच्यावरचा पगडा व पुढे जाऊन काकासाहेब यांनी केलेले सामाजिक शैक्षणिक कार्य या विषयीची माहिती सांगून आपल्या पाठीमागे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभले असून यश हे आपल्या मातीत असून सुवर्णरुपी मोहरे उदयास येऊन ती तेजोमय व्हावीत असा आशावाद कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय संसदे मार्फत भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.भक्तिमय वातावरणात संगीताच्या माध्यमातून गुरूबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. यामध्ये प्रणव पडवळ,मधुर पेंडुरकर,सोहम मेस्त्री,गणेश नांदोसकर,वेदा मराठे,पूर्वी थवी,दिया नांदोसकर,श्लोक चांदरकर,यामिनी म्हाडगुत,वेदांत फोपळे….. यांच्या भक्तीगीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. तसेच विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संगीत साथ प्रशालेचे संगीत शिक्षक श्री. तेंडोलकर सर तसेच विद्यार्थी वेदांत फोपळे, आराध्य रेवंडकर, चिन्मय गोंधळी, व विघ्नेश गावडे यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा च्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर,मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक श्री.ऋषी नाईक, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महेश भाट, शालेय संसद उपाधीपती श्री. किसन हडलगेकर, सहा. उपाधीपती भूषण गावडे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी पालक हितचिंतक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!