*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणात अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची तपासणी*
*मालवण (प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला मालवण ग्रामीण रुग्णालयात प्रतिसाद मिळाला. यामध्ये अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी, स्क्रिनिंग आणि समूपदेशन करण्यात आले.
लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणे, त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे व लक्षणे ओळखण्यास मदत करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते फीत कापून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
शिबिरात २७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यात ४९ महिलांची गर्भाशय ग्रीवा कर्करोगासाठी, तर १५२ महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त, ४९ रुग्णांची ‘Via Pap’ चाचणी, ७ रुग्णांची बायोप्सी, ८८ रुग्णांची हिमोग्लोबिन तपासणी, २७५ रुग्णांचे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. १३९ रुग्णांची संपूर्ण रक्त तपासणी, ११९ रुग्णांची Hba1c, १२५ रुग्णांची A१२५ आणि ४२ रुग्णांची CA १९.९ तपासणी करण्यात आली. तसेच ४९ अन्य प्रयोगशाळा चाचण्याही घेण्यात आल्या आरोग्य सुविधांसोबतच, ९ उपस्थितांचे आयुष्यमान कार्डही यावेळी काढून देण्यात आले, ज्यामुळे त्यांना पुढील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, समन्वयक केतन कदम आणि संतोष खानविलकर उपस्थित होते.
मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी सर्व अधिकारी, जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, स्टाफ यांच्या प्रयत्नांमुळे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे हे शिबीर यशस्वी झाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासोबत उपनेते संजय आग्रे जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, मंदार लुडबे, जॉन नहोना, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख संजना पडते, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुकाप्रमुख प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, आशा वळपी, रिया कुबल, शीला लाड, गीता नाटेकर, रश्मी तुळसकर, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मार्टिन फर्नांडिस, लुद्दीन फर्नाडिस, प्रणिता रेवंडकर, दीपाली कोल्थरकर, क्रांती धुरी, रेवती राणे, अंजना सामंत आदी यावेळी उपस्थित होते.