*कोंकण एक्सप्रेस*
*शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या उत्कर्ष परबचे सुयश*
*कासार्डे प्रतिनिधी; संजय भौसले*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.८वीचा विद्यार्थी कु.उत्कर्ष जयप्रकाश परब याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 46 क्रमांक तर तालुका गुणवत्ता यादीत मध्ये १४ वा क्रमांक पटकावून त्याने शाळेची उज्वल परंपरा कायम चालू ठेवली आहे . तसेच इयत्ता पाचवी मधील कु.शुभम गावडे या विद्यार्थ्याने जिल्हा गुणवत्ता यादीत मध्ये स्थान पटकावून शाळेची मान उंचावली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना इ.8 वी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सौ.सविता जाधव,अनंत काणेकर ,सौ.विधी मुद्राळे,यशवंत परब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि संपुर्ण शिष्यवृत्ती विभागाचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कुल कमिटीचे सर्व पदाधिकारी ,पालक शिक्षक संघ पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी. बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे, जेष्ठ शिक्षक ए.पी. घुले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.