*कोंकण एक्सप्रेस*
*औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांच्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे या प्रशाळेस स्मार्ट टि.व्ही. संच भेट*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
नाधवडे येथील प.पु.श्री.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांच्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे या प्रशाळेस स्मार्ट टि.व्ही. संच भेट स्वरूपात देण्यात आला.
गेली एक वर्षभर शाळेत असणारे टि.व्ही. संच बंद असल्याची खंत मुख्याध्यापिका सौ.अलदर यांनी ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष श्री.हनुमंत नारकर यांना बोलून दाखवली.विद्यालयातील मुलांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून श्री.नारकर यांनी तत्काळ दखल घेत शाळेला दुसर्याच दिवशी औदुंबर सेवा ट्रस्ट च्या वतीने नवीन टि.व्ही संच आणून दिला.
यापुर्वी असणारा टि.व्ही संच शाळेत बंद अवस्थेत असल्याने विध्यार्थी वर्गाची गैरसोय होत होती. यात प्रामुख्याने सन २५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत शिकणार्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
टि.व्ही.संच प्रदान कार्यक्रम नाधवडे हायस्कूल येथे नुकताच संपन्न झाला. औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर यांच्या हस्ते शाळेस टि.व्ही संच भेट देण्यात आला.यावेळेस औदुंबर सेवा ट्रस्टचे खजिनदार रूपेश कुडतरकर,ग्रामविकास मंडळाचे खजिनदार रविंद्र ( बाबा ) खांडेकर,ग्रामविकास मंडळाचे सहसचिव व विद्यानिधी शाळा जुहूचे मुख्याध्यापक संतोष टक्के,प्रशाळेचे लिपिक पुरूषोत्तम कोकाटे, मुख्याध्यापिका सौ.अलदर मॅडम , शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक श्री.पाटणकर यांनी केले तर आभार श्रीम.भाईप मॅडम यांनी मानले.