तळेबाजारमध्ये प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल मार्फत मोफत रेनकोट वाटप

तळेबाजारमध्ये प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल मार्फत मोफत रेनकोट वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेबाजारमध्ये प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल मार्फत मोफत रेनकोट वाटप*

*देवगड : प्रशांत वाडेकर*

जिल्हा परिषद शाळा तळेबाजार व अंगणवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदयार्थांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले .
यावेळी संस्थेचे सदस्य मनिष परब , मिथुन लाड , ऋषिकेश धुरी , जि.प . शाळेचे मुख्याध्यापक समिर कुडाळकर सर , शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणेश लब्दे , उपाध्यक्ष प्रियांका म्हापसेकर, शिक्षिका मिना सरकते , स्नेहा वागंणकर, अंगणवाडी सेविका शोभा कुबडे , मदतनिस साटम , विनायक धुरी आदींच्या उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले .
प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल ता.कणकवली संस्थेने या आधीही आपल्या सामाजिक कार्यातुन नागरीकांना मदत केली असुन शाळेतील विदयार्थ्यांना वहया वाटप असो किंवा कोरोना काळात सिंधुदूर्गात मोफत सॅनिटायझर फवारणी तसेच रूग्नांना फळे वाटप व वाफेची मशिन वाटप करण्यात आली होती . या वर्षी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल ता. कणकवली यांच्या मार्फत कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!