डोळ्यासमोर मोठं ध्येय ठेवून वाटचाल करा

डोळ्यासमोर मोठं ध्येय ठेवून वाटचाल करा

*कोंकण एक्सप्रेस*

*डोळ्यासमोर मोठं ध्येय ठेवून वाटचाल करा*

*अरुण कर्ले : पुंडलीक कर्ले यांची १११वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी*

*देवगड :प्रशांत वाडेकर*

विद्यार्थ्यांनी या वयातच डोळ्यासमोर मोठं ध्येय ठेवून वाटचाल करायला हवी. पुढे जायच असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रश्न पडायला हवेत. प्रश्न विचारा त्यांची उत्तरे शोधचाही प्रयत्न करा. शिक्षणाने प्रगती होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी संस्था विविध उपक्रम राबवित आहे सर्वांनी शिक्षण घेऊन आपल ध्येय साध्य करायचं आहे. संस्था आपल्या कायम पाठबळ देईल असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अरुण कर्ले यांनी शिरगांव येथे केले.
शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संस्थापक अध्यक्ष पुंडलीक अंबाजी कर्ले यांची १११ वी जयंती १५ जुलै रोजी संस्था संचलीत देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यामंदीर कुवळे तसेच पुंडलीक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगांव येथे विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमांची सुरुवात संस्थापक अध्यक्ष पुंडलीक कर्ले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमात १०वी व १२ वी परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. प्रशालेत विद्यार्थ्यांचे विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रशालेच्या कला, क्रिडा आणि सांस्कृतिक भवनाचे यावेळी विद्यमान अध्यक्ष अरुण कर्ले यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. पुंडलीक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतीक विभागाच्यावतीने तालुकास्तरीय मेहंदी, रांगोळी, कोलाज, पोस्टर मेकींग आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमांस संस्थेचे कार्याध्यक्ष अँड. पी.व्ही. साटम, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष संभाजी साटम, विजप जाधव, संस्था पदाधिकारी व संचालक, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, विजय तावडे, मानद अधिक्षक संदीप साटम, सुधिर साटम, संस्थेच्या सर्व समित्यांचे प्रमुख व सदस्य, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य समिर तारी, प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयासिंग रावराणे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. टी. पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सागर करडे यांनी मानले कार्यक्रमास संस्थेचे सभासद, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

.सेवानिवृत्त ग्रामस्थांकडून साऊंड सिस्टीम भेट

शिरगांवातील १४ सेवानिवृत्त जेष्ठ ग्रामस्थांनी शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टिम भेट दिली. त्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अरुण कर्ले आणि सेविनिवृत्त गटविकास अधिकारी आर.जी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!