मधुर पेंडूरकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मधुर पेंडूरकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*मधुर पेंडूरकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा चा विद्यार्थी कु. मधुर अर्जुन पेंडुरकर याने ग्रामीण सर्वसाधारण विभागातून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये 43 वे स्थान मिळवून यश संपादन केले आहे.या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर,सचिव श्री.सुनील नाईक सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे मुख्याध्यापक श्री.ऋषी नाईक, पर्यवेक्षक श्री.महेश भाट यांच्या उपस्थितीत पालक श्री अर्जुन पेंडुरकर व सौ.अपेक्षा पेंडुरकर तसेच मधुर पेंडुरकर याचा शालेय भेटवस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असून संस्था विश्वस्त ॲड.श्री.एस एस.पवार कर्नल श्री.शिवानंद शरद वराडकर खजिनदार श्री.रविंद्रनाथ पावसकर,सहसचिव श्री.साबाजी गावडे,संचालक सौ.सुप्रिया वराडकर सौ.श्रुती वराडकर,सौ.स्वाती वराडकर, श्री शिवराम गुराम,महेश वाईरकर,सल्लागार श्री.सुहास वराडकर,डॉ. व्ही.सी.वराडकर,श्री.व्हिक्टर डॉन्टस, श्री.प्रभाकर वाईरकर,श्री.संतोष साटविलकर ,श्री.नारायण पेणकर, ॲड.ऋषी देसाई यांनी मधुरच्या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री.भूषण गावडे,श्री.किशन हडलगेकर, कु.अमिषा परब,सौ.सिमरन चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!